|
५० शेतकऱ्यांच्या अभ्यास सहलींचे आयोजन
महाडमधील हिरवळ दिलासा या संस्थेतर्फ़े तालुक्यातील ५० शेतकऱ्यांच्या अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात आले.
केंद्र शासनाचा भूसंपादन विभाग, वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाड आणि पोलादपूर तालुक्यातील समूह क्र. १,२ आणि ३ मध्ये समाविष्ट असलेल्या गावांतील ५० शेतकऱ्यांची या अभ्यास सहलीसाठी निवड करण्यात आली आहे.
हे शेतकरी महाड तालुक्यातील आदर्श गाव वरंधला भेट देणार आहेत. वरंध येथे पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत झालेली कामे आदर्श गाव संकल्पना, शिवारफ़ेरी, बचत गटांव्दारे राबविण्यात आलेला भाजीपाला प्रकल्प, लघुपाट बंधारे, पाणलोट कामांमुळे गावाच्या शिवारात अडवण्यात आलेले पाणी, वाढलेली भूजल पातळी याची माहिती या अभ्यास सहलीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात य़ेणार आहे.
हिरवळचे अध्यक्ष किशोर धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक सीताराम कडू, समन्वय कमलेश कोरपे, संपत पाटील, राजेंद्र कडू यांनी या सहलीचे नियोजन केले आहे.
|
|
|
|