|
समाजातील काही असामान्य व्यक्तींना वेगळ्या ओळखीची गरज नसते, त्यांनी समाजासाठी केलेले कार्य हीच त्यांची खरी ओळख! त्यातीलच एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व म्हणजे 'श्री. किशोर धारीया'. भाईंनी त्यांच्या निस्वार्थी कार्यपद्धतीने स्वतःचा ठसा उमटविला आहे, त्यांच्याइतक्या आदर्श व्यक्ती बोटावर मोजण्याइतक्याच सापडतील. त्यांच्या सेवाभावी वृत्तीने ४ दशकांपेक्षा अधिक काळ निर्विवादपणे एक परिपुर्ण आदर्श व्यक्तीमत्व म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे.
किशोरभाई धारीया एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व! २४ ऑक्टोबर १९६७ रोजी ऐतिहासिक महाड (जिल्हा रायगड) येथे भाईंच जन्म झाला. त्यांचे वाणिज्य विषयतील पदविकेचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (महाड) येथे पूर्ण झाले.
भाई म्हणजेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आधुनिक तंत्रज्ञान, जनसामान्यांच्या समस्या आदींचा परिपूर्ण सखोल अभ्यास असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व, याची प्रचिती त्यांच्या समवेत असलेल्या प्रत्येक सहकाऱ्याला आहे.
भाईंकडे पाहिल्यावर एक परिपूर्ण, निपुण, आदर्श समाजसेवकाचे सर्व गुण त्यांच्यात भरभरुन असल्याचे दिसून येते. एवढे असूनसुध्दा त्यांना कोणत्याही गोष्टीचे गर्व नाही. यामुळेच त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे त्यांच्या सोबत आहेत.
सामाजिक संस्था तर सर्वच राजकीय मंडळी व समाजसेवक चालवतात पण किशोरभाईंसारखे लाखात एक असतात की, संस्था स्वबळावर चालवण्याची जिद्द व कर्तृत्व असते, आणि म्हणुनच "हिरवळ प्रतिष्ठान" ही सेवाभावी संस्था कुठल्याही आर्थिक प्रलोभनाशिवाय लोकोपयोगी कामे करण्यासाठी धडपडत असते. कुठलेही कार्य हातात घेतल्यावर ते तडीस नेऊन त्याचे श्रेय स्वतः न घेता समाजाला देवून त्यांचेच अभिनंदन करणारे असे हे किशोरभाई!
महाड तालुक्यातील व जिल्ह्यातील घडामोडी व्यवस्थिपणे समजाऊन घेऊन तेथील प्रत्येक समस्येचा स्वत: जातीने लक्ष देऊन पाठपुरावा करुन ते विषय व्यवस्थित सोडवतात. यामुळेच सर्वसामान्यांच्या मनात त्यांना मानाचे स्थान आहे.
भाईंनी हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातुन संगणकीय शिक्षण देणारे "कॉलेज ऑफ़ आय.आय.टी" व लहान मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच इतर ज्ञानाची माहिती होण्याकरीता "गुरुकुल अकॅडॅमी" सुरु केली तसेच महिलांना सक्षम बनविण्यासाठी "हिरवळ दिलासा" सारखे महिलांकरीता बचत गटाच्या माध्यमातुन रोजगार उपलब्ध करुन दिला. भाई फ़क्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर या वरील विविध विभागात काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याशी आपुलकीने बोलुन त्यांची व त्यांच्या कुटूंबियांची विचारपूस करुन कामाचा आढावा घेतात. यामुळेच किशोर भाई आपल्या सहकार्यांचे दिपस्तंभ आहेत.
भाईंनी नेहमीच माणूस घडवण्याचे काम केले. म्हणतात ना.... "एक व्यक्ती घडला की कुटूंब घडते, एक कुटूंब घडले की समाज घडतो आणि त्यातुनच राष्ट्राची प्रगती होते." पण भाईंच्या मते, "तो व्यक्ती घडवण्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन पाहिजे, त्याच्या परिवाराला उत्पन्नाचे साधन पाहिजे आणि हे जर तो व्यक्ती करु शकला तरच त्याच्यात स्वतःला प्रगतीपथावर घेवून जाण्यात ताकद य़ेईल.' हेच मोलाचे कार्य किशोरभाई करतात.
|
|
|
|