|
'वृक्षारोपण कार्यक्रम'
ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज - तहसीलदार सुरेंद्र नवले
ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार सुरेंद्र नवले यांनी केले. कोंडीवते येथे हिरवळ दिलासा महिला बचतगट व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून राहू नये. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने कर्तव्य भावनेतुन सहभागी होणे गरजेचे आहे. तरच ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या धोक्याला आपण रोखू शकतो. यावेळी हिरवळ दिलासाचे जयप्रकाश रहाळकर यांनी पृथ्वीच्या भूगर्भातील पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. यामुळे भविष्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. पाण्याचे पुर्नभरण करण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्व विषद केले. प्लॅस्टीक पिशव्या वापरावरील निर्बंधाबाबतही त्यांनी आवाहन केले. यावेळी पत्रकार किरण पाध्ये, हिरवळ प्रतिष्ठानचे दिपक शिंदे, नाना घोरपडे, श्वेता पवार, सरपंच - उपसरपंच. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. कोंडीवते येथील आपदग्रस्तांच्या पुर्नवसनाबाबत विचारलेल्या प्रश्नांना तहसीलदार नवले यांनी उत्तरे दिली. यावेळी घोरपडे. सरपंच दिघे, उपसरपंच कांचन शिंदे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष रघुनाथ सावंत यांनी विचार मांडले. दिपक शिंदे यांनी माजी तहसीलदार रहाळकर व तहसीलदार नवले यांच्याहस्ते १०१ सागाच्या रोपांचे वाटप केले. सूत्रसंचालन सुनील कोंडाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्तितेसाठी संपत झांजे, सुप्रिया मोरे, संगीता पलंगे व बचतगटातील महिलांचा सहभाग होता.
|
|
|
|