|
|
|
डोक्यावर ऊन घेवून दुसऱ्याला सावली देणारं झाड उन्हा पावसाची पर्वा न करता ठामपणे उभं असतं. यात या झाडाला कोणताला अभिनिवेश नसतो किंवा गर्वही नसतो. कडक उन्हातही ते तसूभरही सावली ढळू देत नाही किंवा सुखाच्या पावसात ओला चिंब भिजल्यानंतर त्याला अहंकाराचा स्पर्शही होत नाही. ते वर्षातील 365 दिवस दुसऱ्याचं शल्य उराशी बाळगून कृतज्ञतेनं काम करीत असतं. असं हे आनंदाचं झाड म्हणजेच हिरवळ प्रतिष्ठान व त्याचे अध्यक्ष माननीय श्री. किशोरभाई धारिया.
किशोरभाईंचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्या सहवासात आत्मविश्वासाचा नवीन साक्षात्कार व्हावा, कोमेजलेल्या मनांना नकळत उभारी यावी, त्यांच्या केवळ सहवासातून विनम्रता अनुभवता यावी. जमिनीला पाय घट्ट चिकटलेले असले की आभाळाची उंची सहज मोजता येते आपण स्वत: खुपच लहान आहोत असं मानल्यानंतर अनेक मोठी माणसं प्रेमानं जवळ येतात, प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीचा एक तरी गुण आपल्याला नवीन विचार देवून जातो. या किशोरभाईंच्या जीवनशैलीनं त्यांना जगन्मित्र बनवलंय. म्हणून कोणत्याही गावात गेल्यानंतर किशोर धारिया यांच्या आगमनानं राजकिय भिंती गळून पडतात. गावा गावातील द्वेषाचं राजकारण किशोरभाईंच्या सामाजिक दृष्टीकोनातून लोप पावतं. कारण किशोरभाईंच्या प्रत्येक कामामध्ये असते सामाजिक तळमळ. या मनस्वी तळमळीतूनच आज हिरवळ प्रतिष्ठान हि संस्था गावागावातील सर्वसामान्य माणसासाठी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून काम करीत आहे. |
|
|